Skip to main content

Posts

"साइकल" प्रेम कविता

                                "साइकल" तुझ्यासाठी मोटारसाइकल नाही, पण कमीत कमी सायकल तरी व्हावं, अनोळख्या वाटेवरून जाताना, प्रीतीचं गीत गात जावं.. वाटलीच कसली भीती तर, निसर्गाला सोबतीला घ्यावं, निळ्या आभाळाखाली एकमेकांची, सावली बनून  राहावं.. कधी आली घरची आठवण तर, भरल्या डोळ्यांनी एकमेकांना पहावं, मिठीत घेऊन पुन्हा मग, आपल्या प्रीतीचं गाणं गुणगुणावं.. पंक्चर झाली सायकल कधी तर, लटकेच रुसावं, दोघांच्या झालेल्या फजितीवर मग, मनसोक्त हसावं.. विश्रांती घ्यायला सायंकाळी, एखाद्या रम्य नदीकाठी बसावं, तु असचं बोलता बोलता मला, कुशीत घेऊन कुरवळावं.. येणाऱ्या प्रत्येक संकटाला, दोघांनी मिळून सोसावं, आसवांचे मोती करून मग, पुढच्या प्रवासाला चालावं.. चालताना या वाटेवर तू, माझा हात हातात धरावं, अन होऊन स्वार मग सायकलवर, पुन्हा बिनधास्त फिरावं.. फिरून फिरून दमल्यावर कधीतरी, जुन्या आठवणींना परत वाचावं, आठवून ते क्षण पुन्हा, बेधुंद होऊन नाचावं.. अशा आपल्या या नात्याला, कुठलंच बंधन नसावं, अन माझ्या सायकलवर, फक्त आणि फक्त तुझंच नाव असावं.. 😊            -Vk
Recent posts
                      आयुष्य               "मित्रांनो, माणसाचे आयुष्य म्हणजे आळवावरचे पाणी आहे,कधी या बाजूला तर कधी दुसऱ्या बाजूला! कितीही धरून ठेवले तरी ते पाणी खाली पडणारच आहे,त्याचप्रमाणे आपले आयुष्य देखील कितीही जपले तरी त्याचा अंत हा ठरलेलाच आहे।" आपले जीवन संघर्षयाने भरलेले आहे। प्रत्येकाला जीवनामध्ये संघर्ष करावाच लागतो। जो संघर्ष करत नाही, त्याला मारणापेक्षाही कठीण यातना सहन कराव्या लागतात।                आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, चुरस आहे। प्रत्येकजण आपले स्वतःचे व्यक्तिमत्व ठासावण्याचा प्रयत्न करत आहेत, मग ते कोणतेही क्षेत्र असो!                 "मित्रानो, आपल्या या आयुष्याच्या सागरात त्याचीच नाव पार होते, ज्याचा नावाडी चांगला असेल; नाव चांगली असून उपयोगाचे नाही." त्याचप्रमाणे आपल्यातले कितीतरीजन आपल्या अपयश्यामागचे कारण परिस्तिथीला मानतात। खरे तर "परिस्थितीच माणसाला यशाचा दरवाजा खुला करते।" आपली आताची परिस्थिती कशी आहे, यापेक्षा कशी असेल याचा जरा विचार करा..।"परिस्तिथीला अडचण म्हणून नाही तर मार्गदर्शक मानून जगा!" आणि मग